नाशिक : एका बाजूला आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हे सर्वसामान्याचं सरकार असल्याच मुख्यमंत्री एकनाथ वारंवार सांगत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातच कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात हे दर आणखी खाली कोसळतील अशी भीती व्यक्त केली जात असल्याने बळीराजा संतप्त झालाय.
अस्मानी संकटाने शेतकरी चिंतेत सापडलेला असतांनाच आता कांद्याला देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा शेतकऱ्यांना रडवतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण झालीय. कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक किरकोळ भाव शेतकऱ्यांना राग आनावर झाल्याचे दिसून आला.
राजस्थानमधील नवीन कांद्याची होणारी आवक, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आलेला कांदा, यासोबतच कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी उशिरा केलेली कांद्याची लागवड याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याचे दर कोसळले असून येत्या काही दिवसात हे दर आणखी खाली येतील अशी भीती व्यक्त केली जातीय. असे झाले तर कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.