मुंबई : सयाजी शिंदेंच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. अत्यंत धमाकेदार असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ म्हणजे काय याचं कोडं आता लवकरच सुटणार आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी हे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. तसंच या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवातच मजेशीर होते. एक कॉलेज, त्याचं नाव आणि तिथे असलेले विद्यार्थी यांची मजेशीर कहाणी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसंच या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट देखील दिसणार आहे.