कोल्हापूर – Sanitary Napkins at a Nominal Price of One Rupee Per Month | महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दारिद्ररेषेखाली असलेल्या 60 लाख महिलांना एक रूपयामध्ये दहा सॅनेटरी नॅपकिन (Sanitary Napkin) उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 28 मे जागतिक मासिक पाळी दिनाचे (Menstrual Hygiene Day) औचित्य ठेवून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज ही घोषणा केली आहे.
मासिक पाळीवेळी (Menstrual Hygiene Day) घेण्याची काळजी व सफाईतील कमतरतांमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. स्त्रियांच्या मृत्यूतील हे सर्वात मोठे पाचवे कारण आहे. महाराष्ट्रात 66 टक्के स्त्रिया याचा वापर करतात. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे (Maharashtra) स्थान तेरावे आहे. ग्रामीण भागात त्याच्या वापराचे प्रमाण साडेसतरा टक्के इतके असल्याचं हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी म्हटलं आहे.
भारतात 320 दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याची माहिती मुश्रीफ यांनी सांगितलं.