चिंताजनक! माजी आरोग्यमंत्र्यांच्या गाडीला भीषण अपघात

पालघर | Dr. Deepak Sawant Accident – गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेत्यांच्या अपघातांचं सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला मोठा अपघात झाला होता. तसंच आता माजी आरोग्य मंत्री डाॅ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे. एका डंपरनं त्यांच्या कारला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. तसंच या अपघातात दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज (20 जानेवारी) सकाळी डॅा. दिपक सावंत (Dr. Deepak Sawant) पालघरला जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी काशिमीरा भागात एका डंपरनं सावंत यांच्या कारला धडक दिली. या अपघातात सावंत यांच्या मानेला आणि पाठिला दुखापत झाली आहे. तसंच त्यांच्या गाडीचं मोठं नुकसानही झालं आहे.

या अपघातात सावंत यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अँब्युलन्सने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Sumitra nalawade: