ठाकरे बंधु एकत्र येणार? मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव? राज ठाकरेंचे विश्वासू नेते म्हणाले, “युतीवर चर्चा…”

मुंबई | Maharashtra Politics – सध्या अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत गेल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे (Abhijit Panse) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर माध्यमांनी अभितीज पानसे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आज (6 जुलै) मुंबईत माध्यमांनी अभिजीत पानसे यांना तुम्ही मनसे-ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव संजय राऊतांकडे (Sanjay Raut) घेऊन आला होता का? असा सवाल विचारला. त्यावर पानसे म्हणाले की, “तसं काही नाही, मी मनसे पक्षात एवढ्या मोठ्या स्थानावर नाही. राज ठाकरेंचा मी कट्टर सैनिक आहे. त्यामुळे तशी काही वेळ येणार असेल तर मला याबाबत माहिती नाही. जर युतीवर चर्चा करायची असेल तर स्वत: राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यासंदर्भात बोलतील.”

“मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटायला गेलो होतो. त्यामुळे या भेटीचे वेगळे अर्थ लावू नका. या भेटीमध्ये राजकीय चर्चांचा काहीही संबंध नाहीये. संजय राऊतांसोबत माझे फार जुने संबंध आहेत. त्यांनीच मला राजकारणात आणलं आहे. त्यामुळे मी त्यांना काही कामानिमित्त भेटायला गेलो होतो”, असंही अभिजीत पानसे यांनी सांगितलं.

Sumitra nalawade: