‘ठाकरे कुटुंबाचं आणि महाराजांच विशेष नातं आहे’; राऊतांनी घेतले कोल्हापुरच्या छत्रपतींचे आशिर्वाद

कोल्हापूर : (Sanjay Raut On Chatrapati Shahu Maharaj) सध्या राज्यसभेच्या निवडणुकांमुळं महाराष्ट्रातील राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचाराच्या निमित्तानं शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी मात्र, त्यांनी छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chatrapati) यांचे वडील छत्रपती शाहू (Chatrapati Shahu Maharaj) महाराज यांची भेट घेतली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला छत्रपतींचा आशिर्वाद घेण्यासाठी सांगतलं आहे ते मी करत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि छत्रपती घराण्याचं विशेष नातं आहे, त्यांनाही छत्रपतींना बोलायचं होतं.

दरम्यान, संजय राऊत यांनी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांची ‘न्यू पॅलेस’ (New Palace) येथिल निवासस्थानी ही भेट घेतली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी छत्रपतींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे, मी इथे राजकीय गोष्टींवर बोलणार नाही. त्याचबरोबर “छत्रपती घराण्याला कुणी चुकीची माहिती देऊ शकत नाही, छत्रपती आहेत.

मी इथं छत्रपतींचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे, मी इथे राजकीय गोष्टींवर बोलणार नाही” असं राऊत म्हणाले. त्याचबरोबर “छत्रपती घराण्याला कुणी चुकीची माहिती देऊ शकत नाही, ते छत्रपती आहेत असं म्हणत त्यांनी देवेद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) कानउघडणी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छत्रपती घराण्याचं विशेष नातं आहे, त्यांनाही छत्रपतींना बोलायचं होतं.

Prakash Harale: