ठाकरे गटाला दिलासा? सुप्रीम कोर्टातून आली मोठी बातमी

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. परंतु आता ठाकरे गटाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्हासाठी न्यायालयीन लढ्याला सुरुवात केली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ठाकरे गटाला यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आजच सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाबाबत तातडीचा ​​उल्लेख केला आहे.

दरम्यान, शिंदे गटाकडून आता शिवसेनेची कार्यालय ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाच्या आमदारांनी ताब्यात घेतले आहे. तसंच, शिवालयाचा ही शिंदे गट ताबा घेणार आहे. शिवसेना शिंदे गटातील आमदार शिवालयात जाणार आहे. विधिमंडळातील बैठक झाल्यावर ताबा घेणार आहे. शिवालय हे पक्षाचे शासकीय कार्यालय आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचे असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे.

Dnyaneshwar: