नवी दिल्ली : (Thackeray Vs Shinde kapil sibal tweet Defection maharashtra politics) नऊ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केली, तेव्हापासून शिवसेना कोणाचा? हा न्यायालयात संघर्ष सुरु झाला आहे. सात महिन्यांपासून सरन्यायधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी गुरुवार दि. 16 मार्च 2023 रोजी संपली. न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केली आहे. यावेळी दोन्हीकडून अनेक जुन्या निकालांचे दाखले आणि राज्यघटनेतील तरतुदीचे दाखले देण्यात आले आहेत.
दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपली असला तरी निर्णय येणे बाकी आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकूण निर्णय राखून ठेवला आहे. काल सुनावणी संपल्यानंतर आज ठाकरे गटाचे जेष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी केलेलं एक सुचक ट्विट चर्चेत आलं आहे.
यावेळी सिब्बल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, पक्षांतर.. आया गया राम.. और सिया राम दोनो इक्कट्टे नाही हो सक्ते.. या त्यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावरील निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
युक्तीवाद त्यांनी म्हणलं की, न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्व गोष्टींची विचार व्हावा. निवडणूक आयोगाने पक्षाला गृहीत धरले नाही, केवळ विधिमंडळातील बहुमताच्या आधारे निर्णय दिला आहे. पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार पक्षापेक्षा वेगळे कसे? एकाच चिन्हावर निवडणून आलेले वेगळा निर्णय घेऊ शकतात का? आम्ही नेतृत्वावर विश्वास ठेवत नाही, असं फुटीर गट म्हणू शकतो का? यासारख्या अनेक प्रश्नांचा त्यांनी न्यायालयापुढे पाढा वाचला. आता त्यांच्या याच युक्तीवादावर काय निर्णय येतो हे महत्त्वाचे आहेत.