ठाकरेंची शिवसेना ऍक्शन मोड मध्ये; ‘भाजपसोबत जाण्याची इच्छा खासदार भावना गवळींना भोवली’

मुंबई : विधानपरिषदेच्या निवणूक निकालानंतर एका दिवसात शिवसेन पक्षातील अर्ध्यापेक्षा जास्त आमदारांनी बंड केला. उध्दव ठाकरे महाविकास आघाडीत राहून शिवसेनेच्या मूळ हिंदुत्वाच्या तत्वाला विसरत असून शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी मागणी बंडखोर आमदारांकडून करण्यात येत होती. मात्र उद्धव ठाकरे यानी भाजप सोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिला आणि परिणामस्वरूप उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं. त्यामुळं शिवसेनेचे काही खासदारही नाराज असल्याचं दिसत आहे.

सध्या शिवसेनेतील शिंदे गटाने शिवसेना म्हणजे त्यांचा गट असून तीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळ उद्धव ठाकरे आपली शिवसेना वाचवण्यासाठी ऍक्शन मोड मध्ये आलेले दिसत आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पात्र लिहित भाजपसोबत जाण्याची अप्रत्यक्ष मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून भावना गावळी यांना लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हटवण्यात आलं आहे.

भावना गवळी यांना भाजपसोबत हातमिळवणी करण्याची इच्छा भोवली असून आता शिवसेनेच्या लोकसभा प्रतोदावर राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी लेटरहेडवरून हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळं ठाकरेंची शिवसेना आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे.

Dnyaneshwar: