मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

मुंबई | Mukesh Ambani Threat – रिलायन्स (Reliance) उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसंच आता या धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बिहारमधील दरबंगा शहरातून आरोपी राकेश कुमार मिश्राला अटक करण्याती आली आहे.

मुकेश अंबानी धमकी प्रकरणी आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. आरोपीवर आयपीएसच्या कलम 506(2), 507 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. आरोपी बेरोजगार असून त्याने धमकी का दिली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसंच मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणलं आहे.

बिहारच्या ब्रह्मपुरा गावात राहणाऱ्या राकेश कुमारला काल (6 ऑक्टोबर) संध्याकाळी अटक करण्यात आली. काल संध्याकाळी 4 च्या दरम्यान साध्या वेशात पोलीस राकेशच्या घरी पोहचले. पहिल्यांदा पोलिसांनी राकेशच्या मोबाईलवर काॅल केला. त्यानंतर राकेशने काॅल रिसिव्ह केला. राकेशच्या मोबाईलचे लोकेशन कन्फर्म झाल्यानंतर पोलिसांनी राकेशला अटक केली आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या सर एचएन हाॅस्पिटलच्या लँडलाईनवर एक अज्ञात नंबरवरून काॅल आला होता. हे हाॅस्पिटल बाॅम्बने उडवून देण्याची धमकी या काॅलच्या माध्यमातून देण्यात आली होती. तसंच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Sumitra nalawade: