पटना | Tejashwi Yadav – बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. तेजस्वी यादव यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ही गुड न्यूज (Good News) तेजस्वी यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून दिली आहे. तसंच तेजस्वी यांनीही ट्विट करत ही आनंदाची बातमी समर्थकांना दिली आहे.
तेजस्वी यादव यांनी ट्विटद्वारे आपल्या लेकिचा पहिला फोटो शेअर केला आहे. “देवानं प्रसन्न होऊन अनमोल कन्येच्या रूपात भेट पाठवली आहे”, असं तेजस्वी यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ही गोड बातमी शेअर करताच त्यांच्यावर समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये तेजस्वी यादव यांनी राजश्री यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांचा विवाह चर्चेचा विषय ठरला होता. याचं कारण म्हणजे तेजस्वी यांनी त्यांचं लग्न अत्यंत साधेपणानं केलं होतं. त्यांनी लग्नाला खूप कमी लोकांना आमंत्रित केलं होतं.