काँग्रेस नेते सुनिल केदार अडचणीत; नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणी कोर्टानं ठरवलं दोषी

pune 32pune 32

Sunil Kedar | काँग्रेस नेते सुनिल केदार (Sunil Kedar) अडचणीत सापडले आहेत. सुनिल केदार यांना कोर्टानं मोठा धक्का दिला असून त्यांना नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलं आहे. कोर्टानं केदार यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रूपयांच्या घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलं आहे.

आज नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल लागणार आहे. यामध्ये सुनिल केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. 2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 150 कोटींहून अधिक रूपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. या घोटाळ्यातील ते मुख्य आरोपीसुद्धा आहेत.

कोर्टानं सुनिल केदार यांच्यासह केतन शेठ, अशोक चौधरी, नंदकिशोर त्रिवेदी, अमित वर्मा आणि सुबोध भंडारी या सहा जणांना दोषी मानलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, सुनिल केदार हे 1999 साली नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी बँकेमध्ये असलेली रक्कम ही एका खाजगी कंपनीच्या सहाय्यानं कोलकातामधील कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. पण सहकार विभागाच्या कायद्यानुसार बँकेची परवानगी न घेता बँकेची रक्कम दुसरीकडे गुंतवता येत नाही. मात्र, या नियमाचं उल्लंघन करण्यात आलं होतं. ती खाजगी कंपनी दिवाळखोरीत निघाली त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेत ठेवलेले पैसे बुडाले होते.

Sumitra nalawade:
whatsapp
line