वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस

पुणे | दिनांक 30/03/2023 रोजी पहाटे 05:00 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्री. मोहम्मद अब्दुल रहिम कुरेशी हे ड्रायव्हर शेख इफ्तेकार यांच्यासह 8 लाख रूपये रोख घेऊन कापड खरेदी करण्यासाठी बुलेरो पिकअप गाडी नंबर एम एच 20 डि.ई 6059 ही घेऊन जात असताना मोरगाव निरा जाणारे रोडवर ता. बारामती जि.पुणे गावचे हददीत आले असता तीन अज्ञात इसमानी त्यांचे ताब्यातील पांढरे रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीने फिर्यादीच्या ताब्यातील पिकअप नंबर एम एच 20 डि. ई 6059 हिस आडवी गाड़ी मारून चाकुचा व कोयत्याचा धाक धाकवुन जबरी चोरी करून गाडीतील रोख रक्कम 8,07,000/- रु व मोबाईल घेवून गेले आहेत. वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.नं. 121 / 2023 भादवी कलम 394,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सो., मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. आनंद भोईटे सो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे सो., बारामती विभाग यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री सचिन काळे यांना आदेशीत केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक श्री. राहुल गावडे, सहा फौज. बाळासाहेव कारंडे, पो. हवा. सचिन घाडगे, राजु मोमीन, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, आसिफ शेख, सहा फौज काशीनाथ राजापुरे, वडगाव निंबाळकर पो.स्टे. कडील पो.ना. मारकड व पो.कॉ.दरेकर यांचे पथक तयार करून रवाना केलेले होते.

नमुद पथकास तांत्रीक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा सिल्लोड येथील राहणारे मोहित भंडारी, अमोल कुमावत व इफ्ताकर शेख यानी केलेला आहे त्यानुसार 1) मोहित भिकुलाल भंडारी रा. सिल्लोड, संभाजीनगर, 2) अमोल विठ्ठल कुमावत रा सिल्लोड, संभाजीनगर व 3) इफ्ताकर नईम शेख रा. संभाजीनगर हांना संभाजीनगर व सिल्लोड येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे इफ्ताकर नईम शेख याचे तब्यातून 1,00,000 रुपये हस्तगत केले आहेत नमुद आरोपींना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक 10/04/2023 रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे गुन्हयाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे चालु आहे.

Sumitra nalawade: