मुंबई: (Congress Leader Sachin Sawant On BJP) राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले उमेदवार संजय पवार पराभूत झाले, तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यावरच काँग्रेस प्रवक्ते यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये अमीर खानसमोर सायकल चालवताना अनेक अडथळे निर्माण केली जात आहेत. यालाच भाजप तसेच एजेन्सी आणि मविआ सरकारची परिस्थिती म्हणून उपमा देण्यात आली आहे. यावेळी सचिन सावंत यांनी म्हटले की, अपक्षांचे सोडा पण नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदान करायला मिळाले असते आणि सुहास कांदे यांचे मतदान बाद झाले नसते तर भाजपा आणि तपास यंत्रणांचा पराभव निश्चित होता.
संजय राऊतांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, भाजपनं नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला असे मी समजत नाही. पहिल्या पसंतीची ३३ मतं संजय पवार यांना मिळाली, तर धनंजय महाडिक यांचा दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर विजय झाला. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळपास जिंकलो असतो.