आता एस.टी. उलटा प्रवास का?

पुणे ः एसटी महामंडळानेही आधुनिकतेकडे वळत तिकीट काढण्यासाठी ईटीआयएम मशीनचा वापर सुरू केला आहे. परंतु अनेक मशीन नादुरुस्त आहेत. काही मशीन तर पूर्णपणे बंद पडल्याची चर्चा वाहकांत आहे. त्यामुळे एसटी वाहकांच्या हाती पुन्हा एकदा ‘तिकीटाचा ट्रे’ येणार असे दिसते. एसटीचा प्रवास पुन्हा एकदा उलट्या दिशेने सुरु झाला की काय असा सवालच निर्माण होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ईटीएम आता कालबाह्य झाल्या आहेत. असे असतानाही त्या वापरण्याची सक्ती वाहकांना करण्यात येत आहे. या मशिन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकीट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहक त्रासले असून, अनेक वाहकांनी यासंदर्भात प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या बेकायदा संपामुळे एसटीची प्रवासी सेवा तब्बल सहा महिने बंद होती.

एस.टी. संप काळात ईटीआयएम मशीनचा वापर बंद होता. त्यामुळे त्या मशीन ना-दुरुस्त झाल्या आहेत. आता या मशीन आम्हाला वापरणे खूप कठीण जात आहे. तरी या मशीन त्वरित दुरुस्त कराव्यात जेणेकरुन आम्हाला नाहक होणार त्रास वाचेल.
_एस.टी. वाहक

परिणामी, विविध माध्यमांतून येणार्‍या उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागले. सहा महिन्यांत प्रवासी वाहतुकीचा तब्बल २,८२४ कोटी सहा लाख ९१ हजारांचा महसूल बुडाला. मालवाहतुकीला सुमारे ३५ कोटींचा फटका बसला आहे. आधीच सुमारे दोन हजार कोटींपेक्षा अधिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आता संपातील बुडालेल्या उत्पन्नाचाही फटका बसला आहे. त्यात तिकिट मशिन खराब झाल्यामुळे नवीन अडचणी येत आहेत. पाच ते सात वर्षापूर्वी एसटीने बसमध्ये पंचिंग तिकीट बंद करुन तिकीट मशिनचा वापर सुरु केला होता. यामुळे तिकीट काढण्याचा मोठा वेळ वाचला. या निर्णयाचे स्वागतही झाले. पण सुरूवातीपासूनच या मशीन वादात आहेत. अनेकदा तिकीट न येणे, आता एस.टी. उलटा प्रवास का?

चुकीची माहिती तिकिटावर येणे अशा अडचणी येत आहेत. आता तर मशीनच काही मशीन बंद पडल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. जुन्या मशीनचे प्रशिक्षण साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी देण्यात आले होतेे. तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले; परंतु इलेक्ट्रॉनिक मशीनमुळे जुन्या ट्रे वापराचा विसर पडला होता. आता पुन्हा जुन्या तिकीट टे्रचा वापर करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dnyaneshwar: