विस्तारतेय सेकंड हँड मोबाइलची बाजारपेठ

एक चांगला, महागडा स्मार्टफोन बाळगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आर्थिक अडचणींमुळे प्रत्येक व्यक्ती महागडा फोन विकत घेऊ शकत नाही. अशावेळी नवं रुपडं ल्यालेले जुने फोन तुमच्या कामी येऊ शकतात. अशा फोन्स रिफर्बिस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हटलं जातं आणि अशा स्मार्टफोन्सची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे.

या अहवालानुसार रिफर्बिस्ट स्मार्टफोन्सच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्के वाढ झाली आहे. भारतात अशा स्मार्टफोनची मागणी सर्वाधिक असल्याचं दिसून आलं आहे. भारतानंतर लॅटिन अमेरिकेत जुन्या स्मार्टफोन्सना मोठी मागणी असून, अ‍ॅपल आणि सॅमसंग या ब्रँड्सचे स्मार्टफोन्स खरेदी करण्यावर लोकांचा भर असल्याचं सांगितलं जात आहे.

या क्षेत्रातले तज्ज्ञ कार्डाझा यांच्या म्हणण्यानुसार चीन, भारत आणि लॅटिन अमेरिका या देशांमध्ये रिफर्बिस्ट फोन्सच्या मागणीत मोठी वाढ होऊ शकते. या तीन देशांमध्ये असंघटित क्षेत्रातले उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत.

Prakash Harale: