केंद्राकडून इंधनाचे दर पुन्हा वाढू नयेत हीच जनतेची अपेक्षा; अजित पवार

माळेगाव : आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंधन दर कपात, गॅस सिलेंडरवरील टॅक्स कमी करणे, उजनीचे पाणी, आगामी पालखी सोहळ्याचे नियोजन आदी प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्राच्या धोरणात्मक निर्णयाचा समाचारही घेतला. तसंच महाराष्ट्र सरकारनेही अर्थसंकल्पामध्ये गॅस सिलेंडरची किंमत कमी होण्यासाठी एक हजार कोटींचा टॅक्स कमी केल्याचंही त्यांनी आवर्जन सांगितलं आहे. .

अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे काहीप्रमाणात जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु सुरवातीला दरवाढ आणि नंतर जनतेने आक्रोश केला की,मग इंधनाचे दर कमी करायचं हे कितपत योग्य आहे. तसंच परत केंद्र सरकारकडून दर वाढू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर महाराष्ट्रासह देशभर इंधन दरवाढीबाबत जनतेमध्ये आक्रोश होता. जनतेच्या प्रश्नांना माध्यमांनी वाचा फोडलीत्यामुळे केंद्राने पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान,उपसा सिंचन योजनांबद्दल पवार म्हणाले, उजनीच्या पाण्याचे वाटप पुर्वीच झालेले आहे. मंजूर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांबरोबर त्याचवेळीच इंदापूर तालुक्यातील काही गावांना पाणी मंजूर झालेले आहे. काही कारणामुळे या योजनेचं काम होतं नव्हते परंतु आता ज्य सरकारने प्रशासकिय मान्यता दिली आहे. अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडरवर असणारा साडेतेरा टक्के टॅक्स महाराष्ट्र सरकारने साडेदहा टक्क्याने कमी केला असल्याचंही पवार म्हणाले.

Nilam: