रामायणावर अधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट दोन दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मागील काही महिन्यांपासून प्रेक्षक या चित्रपटाची अतुरतेनेप वाट पाहात होते. मात्र, दोन दिवसांत चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात नाराजी निर्माण केली आहे. वास्तव आणि चित्रपटाची रंजक पटकथा यात जमिन असमानाचा फरक दिसून येत आहे. दिग्दर्शकाने डझनभर चुका केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते बिलकूल आवडलेलं नाही. एका बाजूला चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आवडकला आहे तर, दुसऱ्या बाजूला प्रभासच्या चाहत्यांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं आहे.
एकीकडे चित्रपटावर सडकून टीका होत असली तरी, दुसरीकडे बाॅक्स ऑफिसवर सिनेमाने मोठा गल्ला जमा केला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 140 कोटींपर्यंत कमाई केली आहे. तर दिवऱ्या दिवशी ही कमाई 65 कोटींवर पोहचला. त्यामुळे चित्रपटाची दोन दिवसांची कमाई 151 कोटींच्या पुढे पोहोचली आहे.
दरम्यार या चित्रपटाबाबत एक बातमी समोर आली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच आदिपुरुषमधल्या राघवच्या भूमिकेत असलेला प्रभास अमेरिकेत रवाना झाला आहे. तो एका आठवड्याच्या सुट्टीवर अमेरिकेला गेला आहे. प्रभासचा शेवटचा चित्रपट ‘राधे श्याम’ रिलीज झाला तेव्हा देखील तो इटलीला गेला होता. प्रभासचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की, तो लगेचच भारताबाहेर जातो. असं आजपर्यंतच्या माहितीवरुन बोललं जात आहे.