‘खली’चा टोल नाक्यावर राडा, टोल कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात, व्हिडीओ होतोय व्हायरल!

नवी दिल्ली | The Great Khali’s Video Gone Viral – वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनंमेंट (WWE) चा चॅम्पियन ‘द ग्रेट खलीचा’ एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. द ग्रेट खली अर्थात दलीप सिंग राणा यावेळी भररस्त्यात टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसला आहे. खलीने टोलवरील कर्मचाऱ्यांशी घातलेल्या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की खलीकडून आयडी कार्ड मागितले म्हणून त्याने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली. तर कर्मचारी खलीला ब्लॅकमेल करत असल्याचं खली व्हिडीओमध्ये म्हणत आहे. एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी कारमध्ये घुसत होता त्यामुळे हा प्रकार घडला आहे.

द ग्रेट खली जालंधरहून कर्ननला जात असताना हा सर्व प्रकार घडला आहे. तसंच हा व्हिडीओ फिल्लोर टोल प्लाझा जवळील असल्याचा बोललं जात आहे. यावेळी खलीनं सांगितलं की एक कर्मचारी फोटो काढण्यासाठी कारमध्ये घुसत होता. तेव्हा त्याला नकार दिल्यानं वाद चिघळला आणि स्थानिक पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. यानंतर आणखी काही कर्मचारी आले आणि त्यांनी कारला घेरुन खलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांची संख्या पाहता खली कारमधून खाली उतरला बॅरियर हटवून कार नेण्याचा प्रयत्न करत होता. यादरम्यान कर्मचाऱ्याने खलीला बॅरियर हटवण्यापासून देखील रोखले, तेव्हा स्टार रेसलरने त्याला बाजूला ढकलले. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Sumitra nalawade: