भारतात ‘या’ शहरात सर्वात जास्त उष्ण तापमान; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : भारतेची उष्णतेची लाट खुप वाढली आहे. त्यात आता केंद्रीय हवामान विभागाने आती उष्ण शहरांची एक यादी जाहीर केली आहे. दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बांदा हे गेल्या २४ तासांत ४७ अंश सेल्सिअस तापमानासह भारतातील सर्वात उष्ण असणारे शहर ठरले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या हवामान बुलेटिनमध्ये, मेटने ४४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेली शहरं सूचीबद्ध केली आहेत. यातील बहुतांश ठिकाणे राजस्थान, पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, सौराष्ट्र-कच्छ आणि गुजरात विभाग, पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, तसेच ओडिशा इथली आहेत.

  1. बांदा (उत्तर प्रदेश): ४७.४° से
  2. प्रयागराज (उत्तर प्रदेश): ४६.८ अंश से
  3. श्रीगंगानगर (राजस्थान), चंद्रपूर (महाराष्ट्र): ४६.४° से
  4. नौगोंग (एमपी), झांसी (उत्तर प्रदेश): ४६.२° से
  5. नजफगढ आणि पीतमपुरा (दिल्ली), गुरुग्राम (हरियाणा): ४५.९° से.
  6. डाल्टनगंज (झारखंड), रिज (दिल्ली): ४५.७°

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, संपूर्ण भारतातील एप्रिलमध्ये सरासरी तापमान ३५.०५ अंश होते, जे १२२ वर्षांतील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान होते.

Prakash Harale: