“शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका”

पुणे | श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मादी देहू दौऱ्यावर आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचे देहूत आगमन झालं आहे. तसंच पंतप्रधानांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांशी संवाद साधला आहे.

तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचं केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळत राहते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येणे हे माझे भाग्य असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमध्ये शिळा लोकार्पण सोहळ्याच्या वेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, जो भंग होत नाही तो अभंग. शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका आहे. संताची ऊर्जा तुम्हाला गती देण्याचं काम करते. तसंच देशभक्तीसाठी तुकोबांचे अभंग महत्त्वाचे आहेत.

Sumitra nalawade: