श्रीलंकेच्या अध्यक्षांचं श्रीलंकेतून मालदीव नंतर सिंगापूरला पलायन

कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर राजकीय अस्थिरता टोकाला जात आहे. आर्थिक संकटाने त्रस्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी नेत्यांच्या निवासस्थानांना लक्ष केलेलं दिसत आहे. त्यामुळे आंदोलनाने उग्र रूप धारण केल्याचं चित्र आहे. नागरिकांनी श्रीलंकेचे पंतप्रधान गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर आंदोलन केल्यांनतर गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केलेले आहे. ते मालदीव मध्ये होते. मात्र, आज ते सिंगापूरला रवाना होत असल्याची माहिती आहे. नागरिकांच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केल्यामुळे पश्चिम श्रीलंकेत अनिश्चित काळासाठी आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

राजपक्षे यांनी बुधवारी (१३ जुलै)आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं कबुल केलं होतं. मात्र, संसद सभासदांना राजपक्षे यांचा राजीनामा आद्यं मिळाला नाही. त्यामुळे राजपक्षे अजून राष्ट्राध्यक्ष पदावर कायम आहेत. दरम्यान, श्रीलंकेतील सर्व पक्षांनी सर्व्पास्खीय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही. मात्र, २० जुलैला याची अंमलबजावणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dnyaneshwar: