नवी दिल्ली PM Modi inaugurates Ashoks Stambha : संसदेच्या नवीन इमारतीचे काम जोरात सुरु आहे. अगोदरची इमारत जुनी झाली असून त्या इमारतीत लोकसभा सदस्यांना काही काळात जागा कमी पडण्याची शक्यता असल्यानं केंद्र शासनाने नवीन इमारत बनवण्याचा निर्णय घेतला होता. आज नवीन इमारतीवर बांधण्यात येणाऱ्या अशोक स्तंभाचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं आहे. उद्त्याघाटनावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी देखील त्यांच्यासोबत होते. सुरु असलेल्या कामाबाबत तेथील कामगारांशीही त्यांनी संवाद साधला.
पंतप्रधानांनी विजयाचं प्रतिक असलेल्या अशोक स्तंभाचं उद्घाटन केल्यानंतर देशभरातील अनेक नेत्यांकडून संसदेच्या इमारतीचं काम जोरात सुरु असल्यानं कौतुक केलं जात आहे. त्याचेवेळी देशातील विरोधी पक्षांतील नेत्यांकडून नरेंद्र मोदी यांनी अशोक स्तंभाचं अनावरण करून घटनात्मक नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलं जात आहे.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करून पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचं अनावरण करून घटनात्मक नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं म्हटलं आहे. संविधानाने सरकार (कार्यकारी मंडळ), कायदेमंडळ (संसद) आणि न्यायव्यवस्था यांना वेगळं केलेलं आहे. लोकसभा अध्यक्ष हे सरकारच्या अखत्यारीत येतात. सरकारचे मुख्य असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक स्तंभाचे अनावरण करायला नको होतं. त्यांनी अनावरण नियमांचं उल्लंघन केलं आहे. असं ट्विटच्या माध्यमातून ओवैसी यांनी म्हटलं आहे.
आज पंतप्रधान मोदी यांनी अनावरण केलेल्या अशोक स्तंभाची उंची २० असून वजन ९५०० किलो वजन आहे. त्याचबरोबर कांस्यपासून स्तंभ तयार करण्यात आलेला आहे.