मुंबई : (CM Uddhav Thackeray Request on Eknath Shinde) शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. विधी मंडाळात हिंदूत्वावर बोलणार मी पहिला मुख्यमंत्री आहे. शिवसेना कधीही हिंदूत्वापासून दुर गेली नाही. मी काल हिंदू होतो, आज हिंदू, उद्याही हिंदू राहणार मुख्यमंत्र्यानं केलं स्पष्ट. २०१४ साली प्रतिकुल परिस्थितीत शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले आहेत.
दरम्यान, ठाकरे आपल्या बंडखोर आमदारांना म्हणाले, माझ्याचं लोकांना मुख्यमंत्री म्हणुन मी नको असेल तर, मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. तुम्ही समोर या बोला आणि माझा राजीनामा घेऊन राज्यापालांना द्या. माझी काही हरकत नसेल. काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी माझ्यावर आक्षेप घेतला तर चालेल. पण माझ्या आमदारांनी आक्षेप घेतला या गोष्टींचा मला धक्का बसला आहे. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर, माझा आजपासूनचा वर्षावरचा मुक्काम हालवून तो मातोश्री असेल असे ठाकरे म्हणाले.
एवढेच नाही तर, मी शिवसेना पक्षप्रमुख पदाचा देखील राजीमाना देण्यास तयार आहे, “कुऱ्हाडीचा दांडा गवतास काळ” या म्हणीचा आधार घेत, ते म्हणले शिवसेनेवर घाव घालण्याचा प्रयत्न चालु आहे. तुम्हाला जे काय बोलायचं ते समोरासमोर येऊन बोला आणि काय ते सांगा.