वादाच्या भोवऱ्यात असलेल्या अशोक स्तंभाच्या भावमुद्रेवर खुद्द शिल्पकारानेच केला खुलासा

नवी दिल्ली – Parliament Ashok Stambha : ११ जुलै रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीवरील शोक स्तंभाचे अनावर केले होते. मात्र, नवीन अशोक स्तंभाच्या भावमुद्रेवरून त्याचबरोबर पंतप्रधानांनी केलेल्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून देशात वादाचे वातावरण तयार झालेले आहे.

संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये काही दिवसांत सदस्यांना बसण्यासाठी जागा कमी पडण्याची शक्यता असल्याने नवीन इमारतीचे काम सुरु करण्यात आलेले आहे. इमारतीवरील अशोक स्तंभाचे अनावरण पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र, त्या अशोक स्तंभाचं अनावरण करण्याचा पंतप्रधानांना अधिकार नसून त्यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांना देखील अनावरणासाठी सांगितलं नसल्यानं विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना निशाण्यावर धरले आहे.

त्याचबरोबर, अनावरण करण्यात आलेल्या अशोक स्तंभाची भावमुद्रा मूळ अशोक स्तंभापेक्षा वेगळी दिसत आहे. मूळ अशोक स्तंभातील सिंह शांत, संयमी दिसतात मात्र नवीन अशोक स्तंभात बदल करण्यात आले आहेत. नवीन अशोक स्तंभातील सिंह आक्रमक दिसत आहेत. असे आरोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत. त्यावरून वादाचं वातावरण तयार झालेलं आहे. मात्र यावर खुद्द अशोक स्तंभाचे शिल्पकार सुनील देवरे यांनी आपली बाजू मांडली आहे.

‘आम्ही मूर्ती घडविताना मोठं संशोधन करून मूर्ती घडविली असल्याच सुनील देवरे यांनी सांगितलं आहे. प्रत्येक अंगाने स्तंभाचा फोटो घेतला तरी तो वेगळा वाटणार आहे. मात्र, दूर राहून जर फोटो घेतल तर तो मूळ अशोक अशोक स्तंभाशी जुळणारा दिसेल.’ असं स्पष्टपणे देवरे यांनी सांगितलं आहे. मूळ शिल्प हे २ ते ३ फुटाचे आहे, तर सध्याचे शिल्प हे साडेसहा मीटर उंच आणि मोठे आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये फरक दिसून येतो. स्मरत सम्राट अशोक यांनी शांतीचं प्रतिक म्हणून हे चार सिंह निवडले. शांतीचा एवढा मोठा संदेश जगात दुसरा असूच शकत नाही. आणि तोच संदेश ध्यानात घेऊन आम्ही ही मूर्ती तयार केली आहे. असंही देवरे यांनी सांगितलं आहे.

Dnyaneshwar: