खडकवासला : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा वैभवची स्वप्नपूर्ती द्वारकामाई या वृद्धाश्रमाचा उद्घाटन सोहळा थोर विचारवंत संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडला. या वेळी खर्या अर्थाने जर आपण आपल्या आई-वडिलांची सेवा करू शकलो, तर आपण खरे जीवन जगलो व वैभवची स्वप्नपूर्ती करताना ज्या आईने एवढ्या वेदना सहन केल्या. पण हरवून न जाता त्यांनी वैभवची स्वप्नपूर्ती केली, अशी आई जर असेल तर कोणतीच महिला मागे राहणार नाही, तसेच त्यांचे ध्येय पूर्ण होवो, अशा सदिच्छा व्यक्त करत संस्कृतीचा वैभव तुम्हाला मिळाला, असेही ते या वेळी आवर्जून म्हणाले.
कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने ज्यांनी त्यांना मदत केली अशा सामाजिक कार्यकर्त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेविका सायली वांजळे, सुभाष नानेकर, अतुल दांगट, अमोल कारले, राजेंद्र बांदल, संतोष शेलार, विजू इंगळे, डॉ. भाग्यश्री कश्यप, संदीप धावडे, शाहरुख शेख, कैलाश साळुंके, कार्यक्रमाचे आयोजन वैशाली विनायक वेदपाठक यांनी केले. गणेश राऊत व बाळासाहेब नेहेरकर यांनी सूत्रसंचालन केले. विनायक वेदपाठक यांनी आभार मानले.