‘माझे माहेर पंढरी’ कार्यक्रमाने दुमदुमणार अवघी धायरी

शताक्षी खमंग व्हेज, जोशीज् किचन आयोजित

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त माझे माहेर पंढरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या भजनांचे पं. संजय गरुड सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक अतुल दत्तात्रय चाकणकर आणि माधुरी शिवाजी चाकणकर यांनी दिली.

हा कार्यक्रम उद्या रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत धारेश्वर मंगल कार्यालय, धायरी फाटा, सिंंहगड रोड येथे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, रसिक श्रोत्यांसाठी फराळ आणि चहाचे नियोजन करण्यात आले आहे, असे कार्यक्रमाच्या निमंत्रक शताक्षी खमंग व्हेज, जोशीज किचन, धायरीच्या प्रीती जोशी यांनी सांगितले.

माझे माहेर पंढरी कार्यक्रमात पं. शिवदास देगलूरकर (हार्मोनियम), किशोर कोरडे (तबला), तुकाराम मिस्त्री (पखवाज), झी टीव्ही फेम ह.भ.प. स्मिता आजेगावकर साथसंगत करणार आहेत. ३५ कलाकारांचा समूह हे कार्यक्रमाचे
वैशिष्ट्य आहे.

Sumitra nalawade: