अभिनेत्री प्राजक्ता माळीवर राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करावी; सचिन खरात यांची मागणी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसंबंधित अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यादरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

यावेळी सचिन खरात म्हणाले, राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाचे समर्थन केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून देखील त्यांना काढण्यात यावे.

“राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये चिथावणीखोर भाषण केले. तरीदेखील प्राजक्ता माळी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं आहे. प्राजक्ता माळी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण घेतलं आणि आज लोकप्रिय कलाकार झाला आहात.” असंही ते म्हणाले.

दरम्यान, प्राजक्ताने पोस्ट लिहिल्यानंतर लगेचच एडिट केली आहे. पण तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मात्र चांगलीच व्हायरल होत आहे. प्राजक्ताने राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणारी पोस्ट लिहिली होती. 

Sumitra nalawade: