“राज्यात यापुढे आता…”; राज्यातील परीक्षांसंदर्भात उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा!

मुंबई | Uday Samant | ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता आपल्याला ऑनलाईकडून ऑफलाईकडे जायचं आहे. या निर्णयाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. आता यापुढे राज्यात ऑफलाईन परीक्षा होणार असल्याची माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. ते एबीपी माझाच्या ‘प्रश्न महाराष्ट्राचे’ या कार्यक्रमात बोलत होते. Uday Samant

उदय सामंत (State Higher and TEchnical Education Minister Uday Samant) म्हणाले, ऑफलाईन परीक्षेदरम्यान आम्ही विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थांना वेळ वाढवून दिली आहे. आपण अभ्यास कितपत करू शकतो असा विद्यार्थांच्या मनात न्यूगंड होता. त्यामुळे त्यांना परीक्षेआधी प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना काळात विद्यार्थांचा कल बदलला आहे. 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे ते 12 वीच्या अभ्यासाक्रमाकडे दुर्लक्ष करून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेत आहोत. याआधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हा प्रयोग झालेला होता. आता हा प्रयोग पुन्हा करणार आहोत. मेरीटसाठी 12 वी आणि सीईटीचे 50 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि 12 वीच्या गुणांना महत्व देण्यात येणार आहे. असंही उदय सामंत म्हणाले.

Sumitra nalawade: