सहाव्या दिवशीही बेस्ट कामगारांचा संप सुरूच!

मुंबई | Best Bus Strike – मागील सहा दिवसांपासून बेस्ट बसची (Best Bus) अवस्था बिघडलेली आहे. मुंबईकरांवर (Mumbai) ही बेस्ट बस नाराज झाली असल्याचे म्हटले जात आहे. बेस्ट बस कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. पण कामगारांच्या या आंदोलनामुळे मुंबईकर मात्र त्रस्त झाले आहेत. यावर तोडगा काढण्यास सरकार प्रशासनाला अजून यश आले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा संप किती दिवस चालणार आणि आणखी किती दिवस मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

दररोज ३५ लाख लोक बेस्ट बस ने प्रवास करत असतात. बेस्ट ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या शहरी परिवहन सेवांपैकी एक मानली जाते. मुंबईच्या कोणत्याही भागात जायला बेस्टची सेवा आहे. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर अशा बाजूच्या शहरांमध्येही बेस्टची सेवा आहे. गेली अनेक वर्ष भारतातल्या काही नफ्यामध्ये असणाऱ्या विद्युत मंडळांपैकी एक नाव म्हणजे “बेस्ट”. मात्र मागील काही वर्षांत झालेल्या तोट्यामुळे या व्यवस्थेचे संपूर्ण चित्रच पालटले असल्याचे म्हटले जात आहे.

admin: