विजेतेपद जिंकणारा संघ होणार मालमाल

आयसीसी टी २० विश्वचषक : एकूण रोख पुरस्काराची रक्कम $५.६ दशलक्ष

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण $५.६ दशलक्ष रोख बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे ४५.६७ कोटी आहे. यामध्ये, विजेत्याला सर्वाधिक $ १.६ मिलियन म्हणजेच सुमारे १३ कोटी तर उपविजेत्या संघाला मिळणार आहेत सुमारे ६.५ कोटी रूपये मिणार आहेत.

टी २० विश्वचषक २०२२ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना ही मेगा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयसीसीने स्पर्धेची रोख बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केले आहे की १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे विजेत्या व उपविजेत्या संघाला मूळ रक्कम दिली जाईल. १६ संघांमध्ये एक महिना ही स्पर्धा चालणार आहे.

टी २० विश्वचषक विजेत्या संघाला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चॅम्पियन संघापेक्षा कोटी कमी मिळणार आहेत. टी २० विश्वचषक जिंकणाºया संघाला (आयपीएल) विजेत्या संघापेक्षा जवळपास ७ कोटी रुपये कमी मिळणार आहेत. इंटरनेशनल क्रिकेट काउंसिलने आयसीसीच्या टी २० वर्ल्ड कप विजेता संघाला १.६ मिलियन अमेरिकी डॉलर (सुमारे १३.५ कोटी रुपये) मिळतील, तर दुसरीकडे आईपीएल २०२२ च्या विजेत्याला २० कोटी रुपये रोख पारितोषिके या स्वरूपात देण्यात येते.

बक्षीस रकमेची यादी

-विजेता – $ १.६ दशलक्ष (अंदाजे रु. १३ कोटी)
-उपविजेता – $०.८ दशलक्ष (अंदाजे ६.५ कोटी)
-उपांत्य फेरीत पराभूत झालेले संघ – $ ०.४ मिलियन (अंदाजे ३.२६ कोटी)
-सुपर १२ मध्ये प्रत्येक सामना जिंकणाºया संघाला – ४० हजार डॉलर (अंदाजे ३३.६२ लाख)
-सुपर १२ मधून बाहेर पडलेला प्रत्येक संघ -७० हजार डॉलर (सुमारे ५७.०९ लाख)
-पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ – ४० हजार डॉलर्स (अंदाजे
३३.६२ लाख रुपये)
-पहिल्या फेरीतून बाहेर पडणारा प्रत्येक संघ – ४० हजार डॉलर्स (अंदाजे ३३.६२ लाख रुपये)

Sumitra nalawade: