रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने चित्रा वाघ यांच्यावर केले आणखी आरोप, म्हणाली…

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने काही दिवसांपूर्वी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच आपल्याला फुस लावल्याचं तिने म्हटलं होतं. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वेगळं वळण लागलं होतं. त्यानंतर पीडित तरुणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यादरम्यान पीडितेने आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका माडंली तसंच आरोपही केले आहेत.

“मी रघुनाथ कुचिक यांच्यावरील केलेले आरोप खरे असले तरी आमच्यात गैरसमज झाल्याने वाद झाले आहेत. ते बाजुला ठेवून आपआपसात मिटवावं यासाठी माझी तयारी आहे. त्याकरिता त्यांनी रविवारपर्यंत तयारी दाखवावी. तसं झाल्यास सोमवार ते बुधवार दरम्यान तक्रार मागे घेईन. पण जर ते केस लढण्यास तयार असतील तर माझी देखील केस लढण्याची तयारी आहे,” असं पीडित तरुणीने सांगितलं आहे.

पुढे ती पीडिता म्हणाली की, “रघुनाथ कुचिक आणि माझ्यातील वाद मिटल्यास चित्रा वाघ यांच्यावर माझ्या भावनेचा आणि नात्याचा वापर करून बदनामी केल्याबद्दल अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे”. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी एक व्यक्ती असून त्याने आमच्यात वाद निर्माण केले आहेत. त्या व्यक्तीविरोधात देखील गुन्हा दाखल करणार असल्याचं पीडितेने सांगितलं आहे.

Sumitra nalawade: