‘श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय’- शंभुराज देसाई

कऱ्हाड : कोल्हापुर उत्तरच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय झाला आहे. तसंच जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शांत, संयमी आणि दुरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वावर कोल्हापुरच्या निकालातुन शिक्कामोर्तब झाले आहे. मी जाधव ताईंचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रीया गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे.

शंभुराज देसाई हे कोल्हापुरच्या जोतीबाचे दर्शन घेवुन साताऱ्याकडे रवाना होण्यापुर्वी काहीकाळ विश्रामगृहात थांबले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देसाई म्हणाले, कोल्हापुर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. त्याचे श्रेय कोल्हापुरच्या जनतेला आणि महाविकास आघाडीसाठी मतदान केलेल्या मतदारांना आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असलेला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शांत, संयमी आणि दुरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वावर कोल्हापुरच्या निकालातुन झाले आहे. मी जाधव ताईंचे अभिनंदन करतो.

Sumitra nalawade: