पंढरपुर : देशात सध्या अनेक वाद चालू असतानाच आता, आणखी एका वादाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे, असा दावा केला असून, त्याचबरोबर हे मंदिर पुरोहितांकडून बौद्ध लोकांना हस्तांतरित करावे, अशी मागणी जेष्ठ साहित्यिक आणि डाॅ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केला आहे.
ज्ञानवापी मशिद तसेच कुतुबमिनार या इमारतीवरून नवे वाद सुरु असताना आता विठ्ठल मंदिर वाद पेटण्याची शक्यता आहे. पुढे डाॅ. आगलावे म्हणाले, विठ्ठल मंदिरातील भिंतींवर आजही भगवान बुद्धांच्या मुर्ती असल्याचा दावा त्यांनी केला आहे, इतकेच नाहीत तर ‘बालाजी मंदीर, जगन्नाथपुरीसह अनेक मंदिरात पूर्वी बौद्ध विहार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.