मुंबई | PM Narendra Modi – आज (19 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार असून बीकेसी मैदानावर (BKC Ground) त्यांची सभाही होणार आहे. तसंच मोदींच्या (PM Narendra Modi) या सभेसाठी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात डिजीटल पद्धतीनं विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांसाठी पार्कींगची सुविधा व्हावी म्हणून मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आली आहे. त्यामुळे यावर विविध विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. अशा राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी किती वेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी महापालिकेला विचारला आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नेते अमोल माटेले म्हणाले की, ”मुंबई महापालिका आणि विद्यापीठ प्रशासनानं कलिना कॅम्पसची भिंत पाडून विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची सुरक्षा धोक्यात आणली आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी विद्यापीठाचा कॅम्पस वापरणं कितपीत योग्य आहे?” असा प्रश्नही माटेलेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आज पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी येणाऱ्यांना जवळच पार्कींगची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही भिंत तोडण्यात आली आहे. तसंच आजच्या या कार्यक्रमानंतर मुंबई महापालिकेकडून ही भिंत पुन्हा बांधण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.