ऐकावं ते नवलंच! दुचाकील लाॅक होतं म्हणून चोरानं असं काही केलं की ऐकून तुम्हीही लावाल डोक्याला हात…

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhaji Nagar – आत्तापर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. पण आता एक विचित्र चोरीची घटना समोर आली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली आहे. आजकाल नागरिक आपली दुचाकी चोरीला जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसतात. यामध्ये दुचाकीला लॉक देखील लावण्यात येतात. पण छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नसल्यानं, चक्क दुचाकीची दोन्ही चाकं चोरून नेली आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवरील अल्पाईन हॉस्पिटलसमोर घडली आहे. अल्पाईन हाॅस्पिटलमध्ये जिल्हाभरातील रूग्ण येत असतात. त्यामुळे आलेल्या रूग्णांचे नातेवाईक त्या परिसारात आपलं वाहन उभे करतात. अशाच एका रूग्णाच्या नातेवाईकानं आपली दुचाकी रूग्णालयाच्या गेटसमोर उभी केली होती. त्यावेळी काही अज्ञात चोरांनी ही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीला लावलेलं लाॅक तुटत नसल्यानं चोरांनी दुचाकीचे दोन्ही टायरच चोरून नेले आहेत.

या घटनेनंतर आता दुचाकीस्वारांची चिंता वाढली आहे. कारण, दुचाकी नाही तर किमान तिचे पार्ट तरी घेऊन जाण्याच्या चोरट्यांच्या पद्धतीनं दुचाकीस्वारांनी डोक्यालाच हात लावला आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांनी गाडी पार्क करताना काळजी घेण्याची गरज आहे.

Sumitra nalawade: