महिलेने केला मी पार्वती असल्याचा दावा, मी “शंकरासोबत…”

नवी दिल्ली: सध्या लखनऊ मधून चकित करणारी एक घटना समोर येत आहे. चक्क एका महिलेने मी पार्वतीचा अवतार असल्याचा दावा केला असून मी कैलास पर्वतातील भगवान शंकराशी लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे तिच्या या दाव्यामुळे सर्वांनाच नक्की काय प्रकरण आहे? हे जाणून घेण्याची ओढ लागली आहे. तसचं त्या महिलेला माघारी आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तिने सरळ नकार देत मला माघारी घेऊन गेलात तर आत्महत्या करेल अशी धमकी देखील दिली आहे.

सध्या ती महिला भारत-चीन सीमेजवळील नाभिधांग या भागात राहत आहे. ती महिला उत्तर प्रदेशमधील अलीगंज भागातील रहिवासी असून गेल्या काही दिवसांपूर्वी या महिलेने धारचुलच्या एसडीएमकडून परवानी घेऊन ती महिला गुंजी येथे आपल्या आईसोबत गेली होती. परवानगी घेतलेले तिचे तेवढे दिवस संपले तरीही ती मघारी आली नसल्याच समजताच त्या ठिकाणी पोलीस पथक पाठवण्यात आलं होत. परंतु त्या महिलेने आपण पार्वतीचा अवतार असल्याचा दावा केला. आणि मघारी येण्यास नकार दिला आहे. मी कैलास पर्वतातील भगवान शंकराशी लग्न करणार असल्याचंही तिने म्हटलं आहे. यामुळे पोलीस पथकाला रिकाम्या हाताने मघारी परतावं लागलं आहे. असं पोलीस अधिकार्यांनी माहिती दिली.

दरम्यान, आता पुन्हा त्या महिलेला माघारी आणण्यासाठी वैदकीय यंत्रणा आणि बारा पोलीस पथक पाठवणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. तसच त्या महिलेची मानसिक अवस्था स्थिर नसल्याचंही सांगितलं जात आहे. तिने आत्महत्या करणार असल्याचं याच मानसिकतेत म्हटलं असल्याचं सांगितल जात आहे. या घटनेमुळे सर्वांचा धक्का बसला असून चर्चेला उधाण आलं आहे.

Nilam: