मुंबई : सामाजिक न्यायमंञी धनंजय मुंडे यांना एका रेणू शर्मा नामक महिलेने बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता सदरिल महिलेने मुंडे यांच्याकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची देखील मागणी केली आहे. यावरुन महिलेच्या विरोधात मुंबईतील पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला मध्यप्रदेशातील इंदूर येथून अटक केली असून, पुढील तपासासाठी मुंबई पोलिस तिला लवकरच मुंबई येथे हजर करणार आहेत.
दरम्यान, आता मुंडे यांच्याकडूनही असा आरोप केला जात आहे की, या महिलेने आपल्याला फेब्रुवारी ते मार्च महिन्यात एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन करून बलात्काराची तक्रार देण्याची धमकी दिली होती. आणि मला ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली. ५ कोटी रुपयांचे दुकान आणि महागडा मोबाईल द्यावा, असा तगादा आरोपी महिलेने मला लावला होता. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देखील या महिलेकडून देण्यात आल्याचे मुंडे यांनी तक्रारीत सांगितले आहे.
याशिवाय रेणू शर्माने खोटी कागदपत्रे सोशल मीडियावर पोस्ट करून बदनामी करून त्यांचे मंत्रीपद घालण्याचा धमकी त्याने दिली होती. तसं करायचं नसेल तर पाच कोटीचे घर आणि पाच कोटींची कंपनी द्या, अशी मागणीही तिने केली होती. आरोपी महिलेविरोधात पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपी महिलेने काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली होती. पण, काही दिवसानंतर ही तक्रार मागे घेण्यात आली. त्यावेळी देखील महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. आणि विरोधकांना मुंडे यांच्यावर टिका करायला आयते कोलीत मिळाले होतो. एवढ्या दिवस शांत आसणारे प्रकरण आता नव्याने उखरून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. पण, मुंडे यांनी वेळीच स्पष्टीकरण देत त्या माझ्या पत्नी असल्याचं सांगितलं होतं. आणि सर्व प्रकरण शांत केले होते.