पुणे | Pune Metro – पुण्यातील बंडगार्डन ( Bundagarden ) परिसरात हा प्रकार घडला आहे. मेट्रो साहित्याच्या चोरीची घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी कंटेनर स्टोअरचे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे 16 लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा एकूण एक लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ( Pune Police ) गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
पुणे मेट्रो ( Pune Metro ) संबंधित असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचे समजत आहेत. पुणे शहरात अनेक दिवसांपासून मेट्रोचे काम सुरु आहे. त्या कामाचे सर्व साहित्य त्या ठिकाणावरून 33 किलोमीटरवर ठेवलेले आहे. यात 10 किलोमीटर अंतर हे भूमिगत तर 27 किलोमीटर एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे हा पहिला टप्पा सध्या सुरु करण्यात आला आहे. या टप्प्याचं उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी वनाज ते डेक्कन या मार्गावर मेट्रोचाचणी करण्यात आली होती. ती चाचणी यशस्वी ठरली आहे. आता वनाज ते रामवाडी तसेच स्वारगेट ते पिंपरी हे मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे.