‘…यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय’- देवेंद्र फडणवीस

पुणे : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोध पक्ष भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच भाजपाने बीएमसीवर भ्रष्टाचाराचा आरोप करत त्याविरोधात पोलखोल यात्रेची सुरुवात केली आहे. यानंतर सोमवारी या पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक झाली. यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी ते पुण्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणं अपेक्षितच आहे. ज्याप्रकारे यांचा बुर्खा फाटतो आहे, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होतेय. पहिल्या सभेनंतर हे सगळे हादरले आहेत. त्यातूनच ते असा प्रयत्न करत आहेत, पण त्यांनी काहीही केलं तरी यात्रा थांबणार नाही. आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करू.”

Sumitra nalawade: