…तर कारवाई नक्कीच केली जाईल; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे काढा नाहीतर आम्ही त्याच्यासमोर हनुमान चालिसा पठण करू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला भोंगा प्रकरणी अल्टिमेट दिला होता .तसंच महाराष्ट्रदिनी राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा ही घेतली होती . आता त्यांची अंमलबजावणी व्हायला आज पहाटेपासूनच सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसही सतर्क झाले आहेत. याच संदर्भात पुणे पोलीस आय़ुक्तांनी आपली भूमिका मांडली आहे.

तसंच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पुणे शहरात सकाळपासूनच दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. “ज्यांना नोटीस देण्याची गरज आहे, त्यांना नोटीस दिलेलं आहे. कायदा व सुव्यवस्था नीट राहावी म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे. सकाळची अजान लाऊडस्पीकरवर झालेलं नाही. मंदिरातली आरती कोणीही थांबवू शकत नाही. पण जर ठरवून कोणी काही अनुचित प्रकार घडवला तर कारवाई नक्कीच केली जाईल.”असं ही त्यांनी सांगितलं .

दरम्यान,पुणे पोलिसांनी ट्विट करत तरुणाईला आव्हान केलं आहे की, “हे तरुणाई, तुझ्यासाठी..! पुण्यनगरी ही राजधानी असे सर्व शिक्षणाची संस्कृती शिकण्या येथे मांदीयाळी तरुणाईची नको आम्हा भोंगा, दंगा, पंगा अन जातीय तेढ सामाजिक सलोख्याची उभारु या मुहूर्तमेढ..! गुण्यागोविंदे नांदण्या, एकमेकां समजून घेऊ, अवघे धरू सुपंथ..!” असं ट्विटमधून सांगण्यात आलं आहे.

Nilam: