‘…तर मी राज ठाकरेंना नक्कीच हिसका दाखवील’; भाजप खासदाराचा पुन्हा ठाकरेंवर निशाणा!

नवी दिल्ली : मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची (Ayodhya Tour) घोषणा केली होती. मात्र राज यांनी या दौऱ्याची घोषणा केल्यावर उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (MP Brij Bhushan Sharan Singh) यांनी त्यांच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यासोबतच राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती.

राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा रद्द केला, मी अयोध्येमध्ये जाणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले गेले आणि त्यांनीच रसद पुरवली. मनसेचे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसं सापळ्यात अडकवायचं यासाठी मदत केली. या सापळ्यात अडकू नये यासाठी दौरा रद्द केल्याचं राज ठाकरे यांनी पुण्यातील रविवारी घेतलेल्या सभेमध्ये सांगितलं. मात्र आता पुन्हा एकदा बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मी राज ठाकरे यांना 2008 पासून शोधत आहे, जर ते मला कधी विमानतळावर भेटले तर त्यांना हिसका दाखवील. उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेवू देणार नाही, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे हे कोणत्या उत्तर भारतातील राज्यात जातील तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही, असा इशारा बृजभूषण सिंह दिला आहे.

Nilam: