“…तर थोबाड लाल करु”; खैरेंचा भाजपच्या ‘या’ नेत्याला धमकीवजा इशारा!

औरंगाबाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील जाहीर सभेला सुरवात झाली आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी, हजारो शिवसैनिक हजर राहिले आहेत. सुरवातीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जनतेला संबोधित करताना भाजपवर निशाणा साधला आहे. यामध्ये खैरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्यांवर देखील जोरदार टीका करत धमकीवजा इशारा दिला आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, किरीट सोमय्या जर येथून पुढे शिवसेनेविरोधात काही बोलला तर थोबाड लाल करु,असा इशारा दिला. मी सोमय्यांना शक्ती कपूर म्हणतो ते फालतूच काहीही बोलत असतात. अशी टीका देखील खैरे यांनी सोमय्यांनावर केली आहे. त्याचबरोबर सतत आपल थोबाड वाकडं करून सोमय्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. त्याच्या नावाचा एकेरी शब्दात उल्लेख करतात. फक्त भाजपला ठाकरे कुटुंबाला बदनाम करायचं आहे. असंही खैरे म्हणाले.

दरम्यान, खैरे यांनी सांगितल की, जसा भाजपने मुख्यमंत्र्यांना धोका दिला तसाच धोका मला औरंगाबाद मध्ये रावसाहेब दानवेंनी दिला असल्याचं सांगत त्यांनी दानवेनवर देखील निशाणा साधला. याचबरोबर जर औरंगाबाद मध्ये येऊन किरीट सोमय्यांनी काहीही विधानं केली तर, त्यांचं थोबाड लाल करू, अशा धमकीवजा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

Nilam: