‘राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश नाहीत’; गृहमंत्रालयाकडून माहिती जाहीर

मुंबई : रविवारी सकाळपासून राज्यभरात शिवसैनिक बंडखोर शिंदे गटाच्या विरोधात निदर्शने करत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या ऑफिस समोर, घरासमोर शिवसैनिकांकडून आंदोलने आणि घोषणाबाजी केली जात आहे. त्यामुळे त्या आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांकडून राज्यासाराकारणे त्यांची सुरक्षा काढून घेतली असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगण्यात येत होते.

त्यामुळं आज सकाळपासूनच त्या आमदारांच्या घरी सीआरपीएफ जवानांची सुरक्षा लावण्यात आली आहे. राज्य गृहमंत्रालयानं आमदारांकडून केला जाणारा सुरक्षा काढून घेतल्याचा दावा खोटा असल्याचं सांगितल आहे. कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश देण्यात आले नसल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून सांगितले आहे.

Dnyaneshwar: