ब्रेन ट्यूमरविषयी जागरूक राहणे गरजेचे

काही लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. ज्यामध्ये फेफरे येणे, अर्धांगवायू किंवा अशक्तपणा, संतुलन गमावणे, चिडचिड, तंद्री, मळमळ, दृष्टी कमी होणे, ऐकणे आणि चव कमी होणे इ. मेंदूच्या गाठीची शंका असल्यास, डॉक्टर मेंदूच्या विविध भागांची तपासणी करून इतर गोष्टींबरोबरच प्रतिक्षिप्त क्रिया, स्नायूंची ताकद, संतुलन आणि समन्वय समजून घेतील. निदानासाठी वापरल्या जाणार्‍या काही सामान्य चाचण्यांमध्ये पीईटी स्कॅन, एमआरआय, सीटी, एसपीईसीटी इत्यादींचा समावेश आहे.

डॉ. आशिष चुघ, न्यूरोसर्जन, इनामदार हॉस्पिटल

पुणे ः आजची बदलत्या जीवनशैली, स्ट्रेस हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. याच रोगांमध्ये मेंदूचा ट्युमर देखील समाविष्ट आहे. याचा मेंदूतील ट्यूमरमुळे रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ झालेली आढळून येत आहे. एकूणच या आजाराचे रोगनिदान कमी असते. बहुतेक रुग्ण हे ९ ते १२ महिन्यांत मृत्युमुखी पडतात आणि ३ टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण ३ वर्षे किंवा त्याहून अधिक जगतात. त्यामुळे ब्रेन ट्यूमरबाबत जागरूकता वाढवणे ही काळाची गरज आहे. मेंदूच्या ट्यूमरचे स्थान, आकार आणि ग्रेड यासारख्या गोष्टींवर त्याचे गांभीर्य अवलंबून असतात. या आजारामध्ये नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरुन कोणतीही विकृती वेळेत शोधून काढता येईल आणि त्वरित उपचार सुरू करता येतील.

ब्रेन ट्यूमर असलेल्या बहुतेक रुग्णांसाठी सर्वात सामान्य उपचार म्हणजे शस्त्रक्रिया असते. तसेच काही प्रकारच्या ट्यूमरसाठी रेडिएशन सर्जरी, केमोथेरपी सारख्या उपचारपद्धती असतात. ब्रेन ट्यूमरच्या इलाजासाठी सर्जन तारा लावतोच पण त्याच्या मदतीसाठी आज नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. न्यूरोनेव्हिगेशन या नावाने ओळखले जाणारे हे तंत्र शस्त्रक्रियेदरम्यान ट्यूमरच्या अचूक स्थानापर्यंत पोहोचण्यास सर्जनला मदत करू शकते. रुग्णाच्या मेंदूचा एमआरआय किंवा सीटी स्कॅन डेटा सॉफ्टवेअरमध्ये दिला जातो आणि परस्पर समन्वय म्हणून वापरला जातो. यामुळे सर्वात लहान आणि कमीत कमी मार्गाने ट्यूमर सुरक्षितपणे काढून टाकणे शक्य होते.

Nilam: