राज्यात सध्यातरी मास्कसक्ती नाही : राजेश टोपे

मुंबई : देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळं कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता दर्शवली जात आहे. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे. या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय पातळीवर पंतप्रधानांनी देखील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती.या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व पाउलं उचलली जात आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या तरी राज्यात मास्कसक्ती करणार नसल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Dnyaneshwar: