मुंबई : भाजप ही पहील्यापासुन संघर्ष करणारी पार्टी आहे. त्यामुळं आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर योग्य उत्तर दिलं जाईल, असंही त्यांनी खडसावून सांगितलं आहे. आम्ही देशाच्या ४७ टक्के गुंतवणूक राज्यात आणली होती. तुम्ही जर रोज घोटाळे करणार असाल तर कोण येईल तुमच्याकडे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.
सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, काल पोलिस स्टेशनमध्ये माणूस सांगून जातो आहे. बाहेर ७० जण लोकं उभी आहेत तिथे त्यांच्यावर हल्ला होतो, ही लाजिरवाणी स्थिती आहे. राज्यातील हे सगळ्यात वाईट पर्व आहे. राणा दाम्पत्य यांची हनुमान चालीसा म्हणायची इच्छा होती. कशाला येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला केला. जे प्रकरण काहीचं नाही तेच मोठं केलं असल्याचेही ते म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी सहनभुती मिळावी म्हणून हे सगळं केलं. एका महिला खासदाराल रात्री तुरुंगात टाकलं आहे याची पोलिस कर्मचाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. भाजप संघर्ष करणारी पार्टी आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही.