पती आणि मुलीसह प्रियांका चोप्रा भारतात दाखल; परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण

मुंबई | प्रियांका चोप्राने बाॅलिवूडबद्दल धक्कादायक खुलासा केल्यानंतर आता प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झाली आहे. इतकेच नाहीतर यावेळी प्रियांका चोप्रा हिच्यासोबत मुलगी मालती मेरी आणि तिचा पती देखील भारतामध्ये आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाच्या कामानिमित्त तब्बल तीन वर्षांनंतर प्रियांका चोप्रा ही मुंबईत दाखल झाली होती. त्नंयातर बरेच दिवस प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये होती. मात्र, त्यावेळी तिने तिच्या मुलीला भारतात आणले नव्हते. प्रियांका चोप्रा हिची मुलगी मालती मेरी ही पहिल्यांदाच भारतामध्ये आल्यानंतर तिने तिच्या मुलीची झलक पापाराझींना दाखवलीये. प्रियांका चोप्रा हिच्यासोबत पती निक जोनस देखील दिसत आहे.

प्रियांका चोप्रा ही अचानक भारतामध्ये का आली? यावर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा हिची बहीण परिणीती चोप्रा ही प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा ही लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठीच कुटुंबासोबत प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये आल्याचे सांगितले जात आहे. अशी एक चर्चा आहे की, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एप्रिलमध्येच लग्न करणार आहे.

Dnyaneshwar: