योगासनांमध्ये पाळले जातात हे नियम…

आज जागतिक योगदिन आहे. आपल्या राष्ट्राने संपूर्ण जगाला योग आणि आयुर्वेद यांची देणगी दिली आहे. अनेक वेळा आपल्याला माहिती नसल्याने योग करताना आपल्याकडून अनेक चुका होण्याच्या शक्यता असतात. योग करताना पाळले जावेत, असे काही आवश्यक नियम आपण बघणार आहोत…

1)योगासने जेवणानंतर चार ते सहा तासांच्या अंतराने, दूध प्यायल्यावर दोन तासांनंतर, सर्वात उत्तम रिकाम्या पोटी करावीत.
2) शौच व स्नानानंतर योगासने केली गेली तर उत्तम.
3) योगासने करण्यासाठी योगा मॅटचा उपयोग अवश्य करावा. उघड्या जमिनीवर काही न अंथरता कधीही आसने करू नयेत.
4) आसन करीत असताना शरीरावर कुठलाही ताण असू नये. आसन म्हणजे कसरत नव्हे, म्हणून धैर्यपूर्वक आसने करावीत. शरीराच्या क्षमतेबाहेर जाऊन कुठलीही आसने करू नयेत.
5) योगासने केल्यानंतर थंडीत की जोराच्या वार्‍यात बाहेर निघू नये. स्नान करावयाचे असल्यास थोड्या वेळाने करावे.
6) योगासन करताना शरीरावर सैलसर कपडे परिधान करावेत.
7) आसने करताना मध्ये व शेवटी शवासन करून शिथिलीकरणाद्वारे शरीराच्या ताठरलेल्या स्नायूंना आराम द्यावा.
8) आसने झाल्यावर मूत्रविसर्जन केल्यामुळे शरीरात तयार झालेले दूषित तत्त्व बाहेर निघून जाईल.
9) आसनानंतर थोडे पाणी पिणे लाभदायक आहे. ऑक्सिजन व हायड्रोजनमध्ये विभाजन होऊन संधीस्थानातील भागातून मल काढण्यासाठी पाणी खूप आवश्यक असते.
10) स्त्रियांनी गरोदर अवस्थेत जटिल योगासने व कपालभाती करणे टाळावे व मासिक धर्माच्या काळात आसने करू नयेत.

जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

Nilam: