हैदराबाद : येथे शनिवार दि. ०२ रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. यावेळी भाजप शासित १९ राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला सहभागी होते. तर दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याकडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
दरम्यान, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शनिवारी विरोधीपक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे स्वागत केले. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादच्या विमानतळावर आले असता राव स्वागतासाठी गेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत न करत त्यांनी शासकीय शिष्टाचारचं उल्लंघन केल्याचं म्हटलं जातं आहे.
पुढे बोलताना राव म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या ‘दोन्ही उमेदवाराची तुलना करायला हवी. यशवंत सिन्हा यांच्या विजयानं देशाची मान उंचावेल. आज देशात अनेक चुकीचे विषय आणि घटना घडत आहेत. परिवर्तनासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.’यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान सरकारे पडण्यात व्यस्त आहेत आतापर्यंत नऊ राज्यातील ,सरकारे पाडून तुम्ही एक प्रकारे विश्वविक्रमच केला आहे.